कन्या
कन्या
1 min
235
कन्या ही नसते
कुणावर भार,
कारण तिच करते
तिमीरावर प्रहार!
कन्येचा जन्म
समाज मानतो तुच्छ,
कन्याभृणहत्या ही
गोष्ट ना गलिच्छ!
आई ,बहीण ,भार्या,
यांना देतात मानाचे पद,
मग कन्येचा बाप ही
बाब का लज्जास्पद?
नराधमांनी फासली आहे
माणुसकीवर काळीमा,
प्रसंगी ती न्यायासाठी
बनत असते कालीमाॅ!
ललनेचा हुंडाबळी
घेताहेत सासरजन,
धनासाठी छळताहेत
अनेक राक्षसजण!
आम्लहल्यांनी येत आहे
तरूणींना मरण,
म्हणुनच काळाची गरज
महीला सबलीकरण!
