STORYMIRROR

Pratiksha (Ruhi) Kapgate

Romance

4  

Pratiksha (Ruhi) Kapgate

Romance

तुझी स्तब्धता...

तुझी स्तब्धता...

1 min
263

आतुर कर्ण माझे ऐकण्या

तुझ्या प्रेमाचे दोन शब्द,

बोल ना रे मनातले

का रे असा तू स्तब्ध!


वक्तव्य तुझे करती

मजला सदा मंत्रमुग्ध,

खोल द्वार हृदयातले

का रे असा तू स्तब्ध!


रम्य तुझे सौंदर्य पाहून

होते मी नेहमीच लुब्ध,

स्वप्न सांग नयनातले

का रे असा तू स्तब्ध!


संपर्क तुझ्याशी माझा

हे माझे आहे प्रारब्ध,

बंध जोड ना प्रितीतले

का रे असा तू स्तब्ध!


रूसणार मी न आता

जरी असशील तू प्रक्षुब्ध,

जाण प्रेम माझ्यातले

का रे असा तू स्तब्ध!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance