वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता
वाट तुझी पाहता
डोळ्यातले पाणी ही सुकले
तहानलेल्या जीवाना पाहून
अखेर तुझे ही मन द्रवले
पेरलेल्या बीजाना
आस लागली तुझ्या स्पर्शाची
आकाशाकडे झेप घेऊन
कोंबाना ही ओढ लागली वाऱ्या संगे डोलन्याची
चार महिन्यांचा सहवास तुझा
काही आठावङ्यात उरकतोस
तुझा दीर्घ सहवास लाभावा
अशी प्रार्थना शेतकरी नित्य नेमाने देवाकडे करतो
हाथी छत्री धरुनी
प्रेमवीर वाट तुझी पाहतात
रिमझीम बरसणाऱ्या पावसात
सुखी संसाराची स्वप्न बघतात
