हरवलेला स्वर्ग
हरवलेला स्वर्ग
1 min
437
हरवला तो निसर्ग, हरवलं ते गाव
कारखान्याच्या धुराने गिळंकृत केला माझा गाव
शेतातली जमीनीने हरवला बैल आणि नांगराचा स्पर्श
आता फक्तं जाणवतो ट्रॅक्टर चा आवाज कर्कश
पायाच्या तळव्यांना गमावला स्पर्श शेण्याच्या लादीचा
संगमरवरी लादीला कसा गंध येईल गावच्या मातीचा
पिंपळाचा पार वाट पाहत बसतो आता गजालींची
व्हॉट्सअँप वरच्या गप्पांना कशी सर येईल आपुलकीची
आधुनिक उपकरणांनी पायाशी आणलं सर्व सुख
पण माझ्या हरवलेल्या आठवणींना कसं पेलणार हे दुःख
