STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

त्या रिमझिम पावसात

त्या रिमझिम पावसात

1 min
238

त्या रिमझिम पावसाच्या गाण्यात

मी प्रेमाचे गीत गात असताना

तू माझ्याकडे बघून हसतं होती

पावसात येण्याच खुणावत होती

तेव्हा....

माझ्या गाण्यातले ढग जरा जास्तच गरजायला लागले.


मी पहात होतो तुला

पावसाच्या सरींना 

कवेत घेताघेता

तू फुलांचा सडा वेचत होती

मला वाटायचं 

तू फुले वेचायला बोलवशील

पण फुले तुझ्या कवेत जास्तच लाडावलीत


आणि त्या पावसात तुझ्या वेणीसाठी गजराही केला

वाटलं तु बोलवशील वेणीला गजरा लावायला

पण पाऊस तुझ्यावरच मेहेरबान होता


त्या रिमझिम पावसात

तू खुप सुंदर दिसत होती

तेव्हाच माझी प्रेमाची बागही फुलत होती

काय माझ्या गाण्याचा शेवट असेल मला माहीत नाही

पण माझ्या भावनांच्या फुलांना 

तू वेचलेल्या प्रेमाच्या फुलांची सोबत हवी आहे

देशील ना!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance