तूच माझा गुलाब
तूच माझा गुलाब
तिला काय गुलाब देऊ
तिचं एक गुलाब आहे
तिला गुलाब म्हटलं तर
माझ्या कडे लाजत पाहे!!
गुलाबाला तर काटा आहे
पण माझ्या काळजात
तुझ्यासाठी प्रेमाचा साठा आहे
हृदयात माझ्या उसळत्या लाटा आहे!!
तुझ्या हाती गुलाब दिल्यावर
तुझ्या ओठावर कळी उमलली
माझ्या मनातील प्रेमाची ज्योत
तुला पाहून मंद मंद फुलली!!
प्रेमाचं प्रतीक ते लाल म्हणतात गुलाब
एक फुल माझ्यावर प्रेम करते राणी
ही काय कमी आहे बाब
तुला पाहून मी सखे
हसायला शिकलो
बघ या जगाला
जिंकलो मी
पूर्ण झाले
ख्वाब

