STORYMIRROR

Amol Shinde

Romance

3  

Amol Shinde

Romance

तुझ्यावर प्रेम सखे

तुझ्यावर प्रेम सखे

1 min
327

जे व्हायचे नव्हते तेच झाले

तुझ्यावर प्रेम सखे अंदाजेच झाले


तू पाहिलेस तेव्हा

काळजाचा झुला झाला

तूला न भेटताच भ्रमर 

माझ्या जवळ आला


अत्तरांचं फुलं आज वेगळेच झाले

तुझ्यावर प्रेम सखे अंदाजेच झाले

 

सांज जवळी येता

तू प्रेमाचा कौल दिला

तुझ्या मिठीतला मी

अन चंद्र ही सोबतीला


प्रेम झाल्याचे आश्चर्य न्यारेच झाले

तुझ्यावर प्रेम सखे अंदाजेच झाले


तुझ्या ओठांचा स्पर्श

अंग शहारून गेला

तुला निहाळतांना

आरसा तडकून गेला


तुझे सौंदर्य आरशाला प्यारेच झाले

तुझ्यावर प्रेम सखे अंदाजेच झाले


किती दिवसांनी भेटलो

रात्र सारी संपून गेली

तुला पाहता पाहता

नजर माझीच लागली


नजर काढतांना हाल माझेच झाले

तुझ्यावर प्रेम सखे अंदाजेच झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance