STORYMIRROR

अkshay Mulge

Romance

4  

अkshay Mulge

Romance

तुझ्या सवे

तुझ्या सवे

1 min
630

रात्रीच्या त्या नीरव शांततेत

रातकिड्यांच्या किरकिरीत

चमचमणाऱ्या चांदण्यांना पांघरूण

तुझ्यासवे ही रात्र अशीच निघून जावी...


Street-lamp च्या त्या मंद प्रकाशात

निशीच्या त्या दरवळणाऱ्या गंधात

हाती तुझा हात घेऊन

तुझ्यासवे ही रात्र अशीच निघून जावी...


पौर्णिमेच्या शुभ्र प्रकाशात

अमावस्येच्या गर्द अंधारात

दरम्यान बदलणाऱ्या चंद्रकोरीला बघत

तुझ्यासवे ही रात्र अशीच निघून जावी...


कोसळणाऱ्या रात्रीच्या बेभान पावसात

बोचणाऱ्या त्या गुलाबी थंडीत

ओठांनी ओठांना बिलगून

तुझ्या 'कवेत' ही रात्र अशीच निघून जावी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance