Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

तुझ्या सौंदर्याच रहस्य

तुझ्या सौंदर्याच रहस्य

1 min
156


काय असेल 

तुझ्या सौंदर्याच रहस्य

हे तुलाच माहित

पण तुला बघण्यासाठी

सोनेरी पहाट 

तुझी वाट बघत असते 


तुझं नटण मुरडणं पाहून

कळ्याही लाडावतात

तुझ्या कवेत येण्यासाठी

हळव्या होतात

तुला पाहील्याशिवाय 

त्या उमलत नाही

तुझ्या स्पर्शा झाल्याशिवाय 

त्या फुलत नाही


गजराही तुझ्या आठवणीत असतो

इथेतिथे शोधत असतो

त्याला तुझ्या वेणीवर यायच असतं

 तुझ्या सोनेरी केसांवर फुलायचं असतं

 वाऱ्याची झुळुक

तुला छेडत असते

तू आणखीनच 

सुदंर दिसते


तुझं ते नाजूक हसणं

आणि गालावर लाजणारी

तुझी हळवी खळी

सारकाही नजरेला खूणवतं असते

जणूकाही 

सप्तरंगाची उधळण होत असते


तुला पाहून मोरही

नाचायला लागतो

तुला पाहिल्यावर

पिसारा फुलवतो 

अंधारातही तू शोभून

दिसते

तू नजरेआड होवू नये

असे आरशालाही वाटते


काळोखातल्या चांदण्याही

तुझी वाट पहात असतात

तू एकदा दिसावीस म्हणून

काजवेही तुला शोधत असतात


सारा आसमंत तुझ्यासाठी

वेडा होताना दिसतो

तुझ्या सौदर्याच रहस्य

शोधत असतो.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance