तुझ्या प्रश्नांची उत्तरं...
तुझ्या प्रश्नांची उत्तरं...
तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
माझ्या हृदयाच्या स्पंदनात आहे,
ये ना माझ्या मिठीत एकदा
एक एक स्पंदन
तुझंच नाव कोरत आहे,
माझी काया आतुरलेली
तुझ्या कवेत येण्यासाठी
तू का लाजत आहे,
सखे कर ना मनमोकळ तुझं
तुझ्या प्रत्येक प्रश्नांची
उत्तरं तयार आहे,
तू फक्त कर प्रश्न,
माझ्या हृदयाच्या स्पंदनात
त्याची उत्तरं लपलेली आहेत...

