तुझ्या डोळ्यांतले स्वप्न...
तुझ्या डोळ्यांतले स्वप्न...
तुझ्या डोळ्यांतले स्वप्न मी बघायचो,
वादळासोबत येणाऱ्या पावसा सारखं,
कधी कधी तुझं प्रेम बरसायचं
पण त्या गारपिटीतल्या गारा मात्र
मीच वेचायचो ...कारण
तुझ्या डोळ्यांतले स्वप्न मी बघायचो !
तुझे प्रेम म्हणजे ..
निवडुंगाच्या भरजरी काट्यासारखे
कधी कधी माझ्या काळजात खुडायचे,
पण, होऊन त्या काट्याचे मी झाडं
तुझ्यासाठी सावली व्हायचो.. कारण
तुझ्या डोळ्यांतले स्वप्न मी बघायचो!
ते प्रेम होते की नाही माहीत नव्हतं ,
तिच्या मनात काय चाल्लय्ं
ठाऊक नव्हतं ,
पण ती दिसली की मनं म्हणायचे
पाहुन घे मणसोक्त कारण
तिच्यात अन्ं तुझ्यात आहे जातीचं रोपटं
तरिही तुझ्या मागे मी
मौलोन मौल पाई चालायचो .. कारण
तुझ्या डोळ्यांतले स्वप्न मी बघायचो !
जवळ असून ही जात होती दुर- दुर
पुढच्या भेटीची मला असायची हूरहूर
भावनांची रांगोळी पुसत गेली
दोघांतले अंतर वाढवत गेली
मी हे फक्त डोळ्यांनी बघायचो
तरी ही तुझ्यासाठी दूवां माघायचो .. कारण
तुझ्या डोळ्यातले स्वप्न मी बघायचो

