लहानपण
लहानपण
1 min
219
लहानपण आमचं खूप छान होतं
मुक्तपणाचं हिरवं रान होतं
नदीकाठी वसलेलं
सुंदर आमचं गावं होतं
फळा, शाळा हे आमच्यासाठी
नेहमी वरदान होतं
पण आमचं मात्र फक्त
रानातल्या मेव्यांकडेच ध्यान होतं
प्रत्येक सणांना आमच्या
हृदयात स्थान होतं
अन् मोठ्यांशी कसे बोलायचे
याचं मात्र आम्हाला भान होतं
मजा, मस्ती, उनाडक्या
हे तर आमचं कामच होतं
अन् चटणी भाकर आमच्यासाठी
कायम पाची पकवान होतं
खरंच लहानपण आमचं
खूप छान होतं
खूप छान होतं
