तुझं माझं प्रेम
तुझं माझं प्रेम
तुला पहिल्यांदा पाहताच,
मन माझे वेडे झाले..
तुझे बोलके डोळे, तुझा निरागस चेहरा
न बोलताही खूप काही बोलत होते..
तुही माझ्या प्रेमात पडलास
हेच जणू सांगत होते..
एकमेकांच्या सहवासाने
आपलं प्रेम बहरत गेलं..
तूझ्या काळजी करणाच्या स्वभावाने
तूझ्या बद्दलची ओढ वाढत गेलं..
माझ्या आयुष्यात तूझ्या येण्याने,
माझं आयुष्यचं पार पलटून गेलं..
तूझ्या बाहुपाशात
माझं अख्ख जग सामावू लागलं..
तूझ्या चेहऱ्यावरच्या हसू साठी
माझं घड्याळ फिरू लागलं..
तूझ्या माझ्या प्रेम वृक्षावर
एक सुंदर कळी उमलली,
आज त्या कळीला फुलवताना
तूझ्या माझ्या प्रेमाने मोठी उंची गाठली..
तू आहेस म्हणून मी आहे असं मी म्हणत नाही..
आपण दोघे एकत्र असलो की ह्या जगाची मला पर्वा नाही..

