STORYMIRROR

SMITA GAYAKUDE

Others

3  

SMITA GAYAKUDE

Others

आईचं प्रेम

आईचं प्रेम

1 min
304

हळूच तुझी चाहूल लागली, 

आनंदाने मी वेडी झाली.. 


तुला न बघताच मी तुझ्या रूपात हरवून गेले, 

तुझ्या त्या हळुवार हालचालीने मन माझे नाचू लागले.. 


नऊही महिने "सगळे ठीक आहे" या एका वाक्यासाठी तरसू लागले, 

तब्येतीची नेहमीच हेळसांड करणारी मी जास्त काळजी घ्यायला लागले..


मनातल्या मनात तुझी विविध रूपे मी रेखाटू लागले, 

नकळत माझ्या पोटातल्या गोळ्याशी सवांद साधू लागले..


अखेर तो दिवस आला माझ्या हृदयाची धडधड वाढली, 

असंख्य वेदना होत असूनही तुझ्या सुखरूपतेची प्रार्थना मी करू लागली..


तूझ्या रडण्याचा आवाज कानी पडला, 

माझ्या मनाने नि:श्वास सोडला..


तू पहिल्यांदा माझ्या हातात विसावली, 

स्वर्गात असल्याची जाणीव झाली..


तुझे इवलेसे डोळे, पिटुकले हात, गोंडस चेहरा, 

डोळे भरून मी पाहू लागले..


पहिली मुलगी व्हायला भाग्य लागतं म्हणतात, 

आणि खरंच मी भाग्यवान ठरले होते..


तुझ्या रूपात मी स्वतःला शोधू लागले, 

माझं आईपण तुला घेऊन मिरवू लागले..


तू माझ्या जगात आली आणि प्रेम काय असतं ते मला तेव्हा कळालं, 

स्वतःला मरणाच्या वेदनेत ढकलून एका जीवाला आत वाढवणं म्हणजे प्रेम..


रात्रभर आपल्या बाळासाठी जागून सकाळी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागणं म्हणजे प्रेम..


तिच्या चालण्या बोलण्यात,

तिच्या बाललिलेत स्वतःला शोधणं म्हणजे प्रेम..


तिला जगातली सगळी सुखे मिळोत म्हणून अहोरात्र झटणं म्हणजे प्रेम..


तिच्या पायाला ठेच लागू नये म्हणून सगळीकडे फुलांचा गालिचा पसरवणं म्हणजे प्रेम..


बाळा मी आहे तूझ्या पाठीशी जा पुढे तू म्हणून खंबीरपणे उंच भरारी घ्यायला लावणं म्हणजे प्रेम..


खरंच आईच्या प्रेमाला उपमा नाही हे कळतंय मला आईपण जगताना..


तू माझ्यासाठी काय आहे हे सांगण्यासाठी प्रेम हा शब्द पुरेसा नाही..


तूच माझा श्वास, 

तूच माझा ध्यास, 

उंच भरारी घेऊन ये आपल्या घरट्यात, 

हीच आस आहे या प्रेमवेडी आईच्या मनात..


Rate this content
Log in