असा माझा भारत देश..
असा माझा भारत देश..
विविधतेत एकता असलेला माझा भारत देश..
समृद्ध, महान आणि संघर्षमय इतिहास असलेला माझा भारत देश..
नेहमी सत्य आणि अहिंसेवर चालणारा माझा भारत देश..
उंच पर्वतरांगा, अथांग समुद्र, खूप नद्या आणि डोंगरमाथ्यांनी व्यापलेला माझा भारत देश,
ज्या देशात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग, सुखदेव असे शूर वीर होऊन गेले तो माझा भारत देश..
इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नड, बंगाली, पंजाबी, उर्दू, गुजराती अशा विविध भाषेचे लोकं गुण्यागोविंदाने नांदत असलेला माझा भारत देश..
झाशीची राणी, कल्पना चावला, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी अशा कर्तृत्ववान महिलांनी भरलेला माझा भारत देश..
ए.पी.जे अब्दुल कलाम, नारळीकर, होमी भाभा, विक्रम साराभाई सारखे बुद्धिमान वैंज्ञानिक होऊन गेले असा माझा भारत देश..
थोरामोठ्यांचा आदर करायला शिकवणारा माझा भारत देश..
अशा देशावर माझे खुप प्रेम आहे आणि अभिमान ही..
आता ह्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीची आहे..
आणि ही जबाबदारी ही पिढी नक्की पूर्ण करून देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल यात शंका नाही..
जय हिंद..
