तुझं माझं जमेना
तुझं माझं जमेना
तुझं माझं जमेना आणि
तुझ्या वाचून करमेना
भावा-बहिणीचं हे समीकरण
कधी कोणा कळेना
छोटा असो वा मोठा
त्यांचे रुसवे-फुगवे काही कमी होईना
भांडणामधील या त्यांच्या गोड प्रेमाला
सर कशाचीही येईना
"तू तू मैं मैं" चा सुर
त्याच्या रागात नेहमी का असेना
पण छेडलेल्या त्या मधाळ सुराने
मनात कोणतीही अढी नसेना
असतो तो कायम हात सोबतीला
जेव्हा संकटे एकट्याला पेलवेना
न मागताही हक्काने मिळालेल्या त्या आधाराला,
आभाराचा स्वर कधीही न लागेना
अशा या जगावेगळ्या नात्याचं गणित
कधी कोणा उलगडेना
भावा बहिणीचं हे अजीब समीकरण
कधी कोणासही कळेना
