तुझी साथ
तुझी साथ
तुझी साथ हिच आस आजन्म बाळगेन मी
तुझी माझी प्रीत आजन्म सांभाळेन मी
अनेक दुःखाचे डोंगर हसत पार करेन मी
श्वासातला श्वासही तुझ्या सोबतीला उरवेन मी
स्वप्नातल्या कळ्यांना अलगद खुलवेन मी
गंधाळल्या क्षणांना हृदयांतरी झुलवेन मी
तीक्ष्ण शब्दांचे घाव तुझ्या साथीने बुजवेन मी
माझ्या नक्षत्रांच्या वेली तुजसाठी रुजवेन मी
क्रिष्ण सखा तु बासुरीत तुझ्या नादावेन मी
जीवनाच्या सप्त सूरात अलगद विसावेन मी
तुझी साथ जगण्याच्या उमेदीला पुरवेन मी
आला काळ जरी तरी तुझ्यातच मला उरवेन मी