तुझी आठवण येते
तुझी आठवण येते
घराचे छत न्याहाळताना, तुझी आठवण येते
का ती मला ओवाळताना, तुझी आठवण येते
अन् पुन्हा पुन्हा मी अडगळीच्या खोलीत बंद होतो
मलाच मी पुन्हा चाळताना, तुझी आठवण येते
आजही मला उरातला माझ्या,घरातला माझ्या
मी पसारा सांभाळताना, तुझी आठवण येते
थांबतो कधी अचानक, मी वळतो कधी अचानक
पाय उगीच रेंगाळताना,तुझी आठवण येते
उरतो कुठे मी माझा, चांदण्यात चिंब भिजताना
रात्रीस नभ फेसाळताना तुझी आठवण येते

