शाळा
शाळा
1 min
214
ती शाळा, ते दप्तर, ती मस्ती हरवली कुठे?
त्या खोट्या लढाया अन् ती दोस्ती हरवली कुठे?
त्या काटेरी वाटा फुलांच्या,झुडपे उन्हाची
ओढ्याच्या काठाने ती फिरस्ती हरवली कुठे?
त्या उनाड सुट्टया,होते वणवण भटकणे तसे
शाळेला दांडी,रानात वस्ती हरवली कुठे?
तो पाऊस गारांचा,तो हैदोस वाऱ्याचा
आता गळक्या घरांची दुरूस्ती हरवली कुठे?
ती पोटातली कळ,पुन्हा ते पाठीवरचे वळ
तशी मनातली गुरूंची धास्ती हरवली कुठे?
गंध तो अजून येतो नव्या कोऱ्या पुस्तकांचा
पाना-पानातली जुनी हस्ती हरवली कुठे?
