STORYMIRROR

SunilNayakal

Others

3  

SunilNayakal

Others

चल थोडीशी बेईमानी करुया

चल थोडीशी बेईमानी करुया

1 min
184

(वृत्त-पद्मावर्त) 

गागागागा गागागागा गागा 


चल थोडीशी बेईमानी करुया

दुनिया दोघांची वीरानी करुया


प्रत्येकाची मर्जी जपली आता

विसरूनी सारे मनमानी करुया


या विरहाची गोडी चाखायाला

प्रेमाची अपुल्या कुर्बानी करुया


कुठवर नजरेने या बोलायाचे 

चल प्रेमामधली नादानी करुया


वाटे उलथूनी टाकावे सारे

सारेच अदानी अंबानी करुया


येथे दुष्काळाने खचली जनता

मृगजळाचे पाणी पाणी करुया


जग हे काही बदलायाचे नाही

बदलू स्वतःला आसानी करुया


Rate this content
Log in