STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

तुझा आधार असता तर

तुझा आधार असता तर

1 min
385

कशाला हारलो असतो तुझा आधार असता तर 

लढाई जिंकलो असतो तुझा आधार असता तर 


घराला तार काटेरी कशाला लावले असते 

फुलांशी खेळलो असतो तुझा आधार असता तर 


तुला मी सावली मोठी कधी मागीतली नाही 

उन्हाने पोळलो असतो तुझा आधार असता तर 


स्वत:ला शांत करतो मी कुणी अपमान केल्यावर 

जगाशी भांडलो असतो तुझा आधार असता तर 


अपेक्षा अमृताची मी सखी केली कधी नव्हती

विषाला प्यायलो असतो तुझा आधार असता तर 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance