STORYMIRROR

@Aniket Maske

Classics Others

3  

@Aniket Maske

Classics Others

तुह्या हातची भाकरं

तुह्या हातची भाकरं

1 min
184

तुह्या हातच्या भाकरीला 

माये चव अमृताची,

माह्या वरल्या मायेला

गोडी खडीसाखरेची...


येता शहराले माये

मना लागली हुरहुर

तुह्या हातची भाकरं 

खाया मन होई आतुर...


शहरामंधी मिळं बघाया

पाच तारांची हाटेलं,

पैका दिवुन बी हितं

प्वाट ऱ्हातया भुकेलं...


जवा जवा घडे शहराले

मले रोजचा उपास,

काळजा ठेवुन कातरं आठवतो

माये तुह्या हातची भाकरं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics