STORYMIRROR

Ganesh Kambli

Abstract

4  

Ganesh Kambli

Abstract

तो...

तो...

1 min
328

आज जरा जास्तच झालं,

कधी न तुटणारा "तो" आज तुटला...


कधी कधी हवेतही बिलगत असे "तो",

पण आज हवेनेही हात सोडला...


कधी कधी लाटांना पण मागे टाकायचा "तो",

पण आज लाटेने ओढला गेला...


कधी पतंगासारखा "तो" उंच हवेत उडायचा,

पण आज मांजाने कापला गेला...


कधी बोट होऊन खोल समुद्रात फिरायचा "तो",

पण आज भोवर्‍यात अडकला गेला...


कधी पक्षी बनून पिलांना अन्न भरवायचा "तो",

पण आज घरट्यात एकटाच राहिला...


कधी मासा बनून मुक्त विहार करायचा "तो",

पण आज पाण्यातच मरून गेला...


कधी जमिनीवर कधी पाण्यात कासव बनायचा "तो",

पण आज फक्त एकाचाच बनून राहिला...


कधी विश्र्वासातून तर कधी श्वासातून तुटत राहिला "तो",

पण आज जरा "धीर" जास्तच तुटून राहिला... 


Rate this content
Log in

More marathi poem from Ganesh Kambli

Similar marathi poem from Abstract