ती प्रेमळ प्रेयसी
ती प्रेमळ प्रेयसी
1 min
426
ती दिलखुलास हसली
म्हणजे सदाफुलीच फुलते
ती मनमोकळं भांडली
म्हणजे बिजलीच कडाडते
तिच्या डौलदार चालीवर
जीव ओवाळणी घालावी वाटते
काळया लांबसडक केसात
गुरफटून जीव गेला तरीही बरेच
तिचा नाजूक कोमल हात
हातात घेता स्वर्ग समिप वाटे
क्षणभर तिच्यापासून दुरावा
जणू हृदयी टोचले काटे
लालचुटूक त्या ओठांवर
ती खडीसाखरेचे पीक घेते
हळूच लावूनि डावा डोळा
माझ्या काळजाचा नेम साधते
तिच्या प्रेमाची ही जादूगिरी
मी तहान भुक हरवून बसलो
तिने दिले स्मितहास्य असे
मी डोळ्यातले पाणी लपवून हसलो