STORYMIRROR

DINESH KAMBLE

Others

3  

DINESH KAMBLE

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
45

ओढ पावसाची लागे 

जेव्हा धरणीच्या मनी 

गुंज पक्षाचे गुंजती 

गाती मिलनाची गाणी 


धरा व्याकुळली फार

वरूणाच्या भेटीसाठी 

वाटे औंदा श्रावणात 

त्याच्या व्हाव्या भेटीगाठी 


रानातल्या बाभळीची 

पित फुले कोमेजली 

आला आषाढाचा घन 

चिंब धरा ती भिजली 


मातीसह त्या साऱ्यांना 

लागे ओढ पावसाची 

बरसून रे मेघांंनो

तृष्णा क्षमवा तयांची 


साहित्याला गुण द्या
लॉग इन