STORYMIRROR

Apurva Thete

Romance Fantasy Others

3  

Apurva Thete

Romance Fantasy Others

ते पहिलं प्रेम असत!!!!

ते पहिलं प्रेम असत!!!!

1 min
150

जेव्हा पाऊस हवाहवासा वाटतो आणि थंडी पण ऊब देऊन जाते..

स्मरण होताच त्याचे, मन रोमांचित होऊन जाते..

जेव्हा दिवस आणि रात्र याच भान विसरायला होत असत..

ते पहिलं प्रेम असत..!!


जेव्हा गर्दीत पण नजर त्याला च शोधत असते..

नुसत्या विचारानेच त्याच्या, मन बेधुंदपणे उडते..

ज्याच्या असण्याने आपलं अस्तिव असतं..

ते पहिलं प्रेम असत..!!


चांदण्या रात्रीत डोळ्यात त्याचंच स्वप्न असत..

आठवणीत त्याच्या नकळत ओठावर हसू येतं असत..

जे शब्दात व्यक्त करता येणार नसतं..

ते पहिलं प्रेम असत..!!


ज्याला हसताना पाहून सगळे दुःख निघून जातात..

 त्याच्याच अवती भोवती जेव्हा आयुष्य फिरायला लागत..

ज्याला पाहून प्रेम काय असत हे कळत..

ते पहिलं प्रेम असत..!!


ज्याच्या स्पर्शाने हृदयाची स्पंदने वाढत जातात..

देह शहरतो आणि डोळे अलगद बोलायला लागतात..

ज्याचं आयुष्यात असण हेच जणू जगण्याच कारण असतं..

ते पहिलं प्रेम असतं...!!


जे हृदयात असत पण बहुतेक वेळा नशिबात नसतं..

जे क्वचित च पूर्ण होणार असत...

जे कधीही विसरता येणार नसतं..

ते पहिलं प्रेम असतं...!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance