रक्षाबंधन
रक्षाबंधन
1 min
247
जो लहान लहान गोष्टीमध्ये भांडतो
पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत राहतो
तो भाऊ असतो..!!
जो कधीही कोणासमोर झुकत नसतो
पण बहिणी साठी वाट्टेल ते करायला तयार असतो
तो भाऊ असतो..!!
जो बहिणीच्या सुखात साथीदार असतो
पण दुःखात वाटेकरी म्हणून नेहमी पाठीशी असतो
तो भाऊ असतो..!!
जो आईची माया, बाबांचा धाक असतो
पण मित्र बनून नेहमी साथ असतो
तो भाऊ असतो..!!
जो कधीही बोलूंन दाखवत नसतो
पण बहिणीवर सगळ्यात जास्त प्रेम करतो
तो भाऊ असतो..!!
जो सगळ्या नात्यांपेक्षा वेगळा असतो
पण बहिणीच्या काळजाचा तुकडा असतो
तो भाऊ असतो..!!
