आई !!!
आई !!!
1 min
217
आई म्हणजे मायेच आकाश
आई म्हणजे भूतलावरचा प्रकाश...!!!
आई म्हणजे संस्कारांची खाण
आई म्हणजे घराचा मान...!!!
आई म्हणजे जगण्याचा अर्थ
आई म्हणजे न कुठलाही स्वार्थ...!!!
आई म्हणजे प्रेमाचा महासागर
आई म्हणजे देवाचा जागर...!!!
आई म्हणजे मंदिराचा कळस..
आई म्हणजे दारा समोरची तुळस...!!!
आई म्हणजे उन्हातली सावली
आई म्हणजे सर्वश्रेष्ठ माऊली...!!!
आई म्हणजे जगण्याच सार
आई म्हणजे देवाचा अवतार...!!!
आई म्हणजे संकटात मिळणारी शक्ती
आई म्हणजे देवाची करावी अशी भक्ती...!!!
आई म्हणजे प्रेम, त्याग, कर्तृत्व, संस्कार
आई म्हणजे कधीही न फेडता येणारे उपकार...!!!
आई म्हणजे सुखाची, मायेची, प्रेमाची फ्रेम..
आई म्हणजे निस्वार्थ प्रेम... निस्वार्थ प्रेम...!!!
