STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

तारुण्याचें मदें घेशी

तारुण्याचें मदें घेशी

1 min
14.3K


तारुण्याचें मदें घेशी एकमेंकां झोबीं ।

वायां जाईल नरदेह धरीं हरीशी झोंबी ॥१॥


तरीच खेळ भला रे वायां काय गलबला ।

एकावरी एक खाली पडतां मारी यमाजी टोला रे ॥२॥


हातीम हात धरुनियां घालिसी गळां गळाखोडा रे ।

फजीत होसी खालीं पडतां हांसतील पोरें रांडा रे ॥३॥


एका जनार्दनीं म्हणे खेळ नोहें भला रे ।

आपण न पडतां दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics