STORYMIRROR

Kalpana Shinde

Tragedy

3  

Kalpana Shinde

Tragedy

स्वर्गवासी लतादीदी

स्वर्गवासी लतादीदी

1 min
253

आज सुने झाले शब्दांगण 

अंधारले गीतांचे तारांगण..


सूराविना शब्द राहिले अधुरे

सुरच गात होते भाव गहिरे...


कोकिळकंठ झाला स्तब्ध 

सुर हळहळला नि:शब्द...


संगीताची सुरेल साधना

देवाधीन झाली आराधना..


सप्तसूर गीत हरवले

अश्रू बनून शब्द ओघळले..


वसंताची लागली होती चाहूल

गानकोकिळेचे स्वर्गात पाऊल...


शब्द सुरांची ही दुर्मिळ गाथा

सजेल मैफिल स्वर्गात आता...


होतील गायिका कित्येक

परी हिच्यासम हीच एक...


गान सम्राज्ञी तुम्ही लतादीदी 

आठवतील सर्वांनाच पदोपदी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy