कोरोना
कोरोना
1 min
285
देव जाणे कसा, कुठुन आला कोरोना,
सुटसुटीत,राहून प्रसार त्याचा रोखा ना!
पसरला जगात सुसाट वेगाने,
रेल्वे,विमान ,बस सारे,त्वरेने झाले ठप्प,
जगाला सुद्धा घरात बसावे लागले गप्प!
कोरोना कितीही असला जरी गंभीर,
तरीही राहीले पाहीजेत तुम्ही खंबीर!
खचू देऊ नका कुणीही तुम्ही धीर,
दिसेल कधीतरी किनारा,पैलतीर!
जग होवो लवकर कोरोनामुक्त,
श्रद्धेने म्हणू आपण सारे श्रीसुक्त!
