ऋणी (षटाक्षरी)
ऋणी (षटाक्षरी)
सुचते क्षणात,
उतरे शब्दांत,
विसरे मनात,
कविता जन्मांत!
वेदना अंतरात,
दु:ख जीवनात,
हताश मनात,
प्रेरणा सुरात!
झुळझुळ वाहे,
सरिता सतत,
वेदना वाहून,
जाते शब्दांत!
नकळत येती,
नयनी जलधारा,
कविता सुचून,
पुसे जलधारा!
कधी बहरते,
माझी काव्य सृष्टी,
हर्षीत मनाला,
मिळे नवी दृष्टी,
शतशः ऋणी मी,
माझ्या कवितेची,
ओंजळ वाहते,
शब्द - सुमनांची!
