पाऊसधारा
पाऊसधारा
1 min
249
पावसाची ही संततधार,
सुखावते मज मनास फार!
एकसारख्या सरीवर सरी,
उतरल्या धरणीवर जलपरी!
जगाच्या कल्याणा अवतरल्या,
भुगर्भात विलीन जाहल्या!
तहानेली धरती तृप्त झाली,
आसुसलेल्या नजरेत शांती आली!
सृष्टी चिंब भिजली पावसात,
गीत गाते आनंदी सुरात!
सुखावला बळी राजा,
म्हणे धाव रे वरुणराजा,
सुखी कर तुझी प्रजा!
वृक्ष आणि पाने, फुले,
पशु,पक्षी व मुले,
सर्व सृष्टी तुजसंगे डुले!
करे तो सृष्टीचे नंदनवन ,
तेंव्हा ठरे तो वरदान!
पावसा तुझे सुस्वागत,
तुझे गुणगान मुखात!
