स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रिया
स्वातंत्र्यपूर्व काळातील कर्तृत्ववान स्त्रिया
महाराष्ट्राची राजमाता तू जिजाऊ
हिंदवी स्वराज्याची शान जिजाऊ
रयतेचा आधार अभिमान जिजाऊ
सिंदखेडराजा माहेर वेरूळ सासर
मराठा साम्राज्य हाच महानिर्धार
शिवबावरी स्वराज्य हाच गर्भसंस्कार
आईच्या मनात स्वराज्य धोरण
मावळ्यांनी बांधले तोरणा तोरण
रयतेचावाली झाला टळल मरण
आदिशक्ती तू रयतेचं जीवन
पर स्त्रीला मानावे मायबहीण
सन्माननीय ती हीच शिकवण
जिजाऊ शिकविला अर्थ स्वराज्याचा
दूर सारल्या बेड्या गुलामीच्या
आई तू सुवर्ण कळस मंदिरांचा
महाराष्ट्राची तू ग मायमाऊली
जणू वटवृक्षाची गर्द सावली
जन्माने भूमी धन्य जाहली
जिजाऊ तुझ्या कुशीत महाराष्ट्र नांदतोय
तीनशे वर्षे उलटली तरीही
जिजाऊ तुलाच माय मानतोय.
