स्त्री जन्माचे स्वागत
स्त्री जन्माचे स्वागत
संसाराच्या कल्पलतेवर
फुल गोजिरे डुलत होते,
मुलीच्या जन्मामुळेचं माझे
जीवन सोहळ्यासम झाले होते.
घट्ट हृदयाशी हळूवार
एक परि बिलगली होती,
माझ्या घरी सुंदर एक
राजकन्याचं जन्मली होती.
सैलसर वाटणारी मिठी
दुधाने ओथंबली होती,
देवानेचं माझ्या घरी साक्षात
माझीचं सावली पाठवली होती.
रुप तिचे ते चंद्रकलेसम
दाही दिशा उजळीतं होते,
शब्दामधूनं तुझ्या मुली
अमृताचे घटच पाझरत होते
दोन्ही कुळांला उजळणारी
पणती घरात तेवत होती,
हृदयाच्या गाभाऱ्यात साक्षात
लक्ष्मी माताचं प्रगटली होती
नवा जिव्हाळा, नवे तराणे
मुलगीच घराची शान आहे,
घराघरातं नक्षत्रांच्या फुलवातीची
ती अखंड नंदादीप आहे.
