STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Classics Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Classics Inspirational

स्त्री जन्म एक स्वाभिमान

स्त्री जन्म एक स्वाभिमान

1 min
709

आदिशक्ती तू,

प्रभूची भक्ती तू,

झाशीची राणी तू,

मावळ्यांची भवानी तू,

प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,

आजच्या युगाची प्रगती तू.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

विधात्याची निर्मिती तू,

प्रयत्नांची पराकाष्ठा तू,

एक दिवस तरी साजरा कर तुझ्यासाठी तू,

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

ती आई आहे, ती ताई आहे, 

ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, 

ती मुलगी आहे, ती जन्म आहे, 

ती माया आहे, ती सुरूवात आहे 

आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

स्री म्हणजे वास्तव्य, 

स्री म्हणजे मांगल्य, 

स्री म्हणजे मातृत्व, 

स्री म्हणजे कतृत्व 

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

नारी हीच शक्ती नराची

नारीच हीच शोभा घराची

तिला द्या आदर, प्रेम, माया

घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा...

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

 

तू भार्या,

तू भगिनी,

तू दुहिता,

प्रत्येक वीराची माता,

तू नवयुगाची प्रेरणा 

या जगताची भाग्यविधाता. 

महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

स्त्री असते एक आई

स्त्री असते एक ताई

स्त्री असते एक पत्नी

स्त्री असते एक मैत्रिण

प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

ती आहे म्हणून हे विश्व आहे

ती आहे म्हणून घराला घरपण आहे

ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे

तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा...

 

मुलीच्या निखळ प्रेमाला सलाम

आईच्या नि:स्वार्थ त्यागाला सलाम

बहिणीच्या प्रेमळ मायेला सलाम

स्त्रीमध्ये दडलेल्या असामान्य स्त्री शक्तीला सलाम

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics