सरकार
सरकार
हे सरकार म्हणजे काय असत
ते कुठं राहत, कुठं बसत,
कधी उठत, कधी झोपत,
कधी बोलत, कधी मुक बधीर असतं,
काय कमावत, काय गमावत,
काय विकत, काय मारत,
सरकार म्हणजे,
श्रमिकांच शोषण असतं, पोहोचलेल्याच पोषण असतं,
सरकार म्हणजे
घोषणांच भांडार असतं, आश्र्वासनांच कोठार असतं,
सरकार म्हणजे
अनुदानाच पोस्टर असतात, घेणा-याचे हात आखुड असतात,
सरकार म्हणजे
निवडणूकींचा समारंभ असतो, खुर्चीसाठी झगडण्याचा दंभ असतो,
सरकार म्हणजे
समाजकार्याचा कार्यक्रम असतो, समाजसेवेचा आरंभ असतो,
सरकार म्हणजे
धर्माधर्मात धर्म माजवुन निधर्मी असतं, युद्धासाठी ठेवलेलं ट्रम्पकार्ड असतं,
सरकार म्हणजे
नोकरदारांच मायबाप असतं, मालमत्तावाल्यांच साधन असतं,
सरकार म्हणजे
सर 'कार' मध्ये असतात,
सर, सर, करणार्यांचे सरकार असतात.
