STORYMIRROR

Sujay Desai

Abstract Tragedy

4  

Sujay Desai

Abstract Tragedy

सर , जरा थांबा....

सर , जरा थांबा....

1 min
387

सर....

जरा थांबा तरी

नाही तर या ना नंतरच

पण....

नक्की या हं !

भेटेल नक्कीच

पण आत्ता नाही

मीही आहे बाहेरच

गिर्‍हाईक करत आहे माझी आई....


बाप....?

आजवर त्याचा पत्ता नाही

शिकवलं आहे तिनच इथवर

शिकवीन म्हणते पुढंही

नकोस घाणीत राहू म्हणते

बाळा, तुझीच चिंता राही

जा पुढे तू माझ्या लेकरा

प्रगती कर जगाबरोबर तूही


सर....


तुमच्या शाळेच्या प्रवेश फाॅर्मवर

चालेल ना फक्त माझ्या आईची सही ?

भेटेल नक्कीच शिक्षणासाठी माझ्या

सर, थांबाल ना थोडा वेळ ?

गिर्‍हाईक करत आहे माझी आई....


रोज माणसांचं येणं-जाणं

त्यातून तिनं मला शिकवणं

पडते आजारी कधी-कधी

जीवाला तिच्या सुख नाही


म्हणणारे म्हणतात तिला 'बाई'

पण तीच आहे माझी गोड 'आई'

मॅडमनांही थोडं थांबा म्हणा

 इतक्यातच येईल माझी आई


 सांगत होती पोलिस मामांना

 बालपणीच विकलं तिला

 कुणीतरी

 तिलाही आई-बाप आठवत

 नाही

 म्हणते रडून कधीतरी

 मार्ग यातून दिसत नाही

 आशेचा किरण दाखवा तुम्ही तरी

 तिला 'भाऊ' कोणी नाही


सर,आता तुमच्याकडून आशा

शिक्षणाची अन संस्कारांचीही

माफ करा सर,

जीव गुदमरला असेल तुमचा इथे

पण रोजच मरण बघते माझी आई

थोडच थांबा सर....

इतक्यात येईल माझी आई....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract