Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Charudatt Mehare

Romance Others

2  

Charudatt Mehare

Romance Others

संसाराचे गाणे

संसाराचे गाणे

1 min
349


तु असतांना संसाराला माझ्या काय उणे, 

चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे.|| धृ ||


सप्तपदी चालता चालता दिली ऊभयता वचने

पदोपदी तु पाळत आली मनापासुनी सजणे,

दु:खी असता लपवून सारे वदनी हासू उसने

चल सखे चल गावू मीळुनी संसाराचे गाणे..|| 1 ||


सांजवेळी तु नित्य अंगणी मंद लावीता पणती

शांत मनातील तिच्या प्रकाशे भाव वदनी उजळती,

नजरेवर तव नजर ही पडता हळुच तुझे लाजणे

चल सखे चल गावू मिळुनी संसाराचे गाणे..|| 2 ||


संसाराच्या वेलीवर ही फुलली दोन फुले

बोल ऐकता कानी तयांचे आनंदे मन झुले,

बाललिला ग बघता त्यांचा मुक्तपणे हासणे

चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे..|| 3 ||


सुख-दु:खाच्या वेळी मजला तुच प्रिये सावरले

दृष्टीआड क्षणी होता तू मन माझे बावरते, 

भाव भितीचे मज चेह-यावर पाहून तव घाबरणे

चल सखे चल गावू मिळुनी संसाराचे गाणे..|| 4 ||


अनेक जन्मांसाठी पडाव्या अपुल्या रेषीम गाठी

साथ मिळावी तुझी मला ग सहस्त्र जन्मांसाठी,

ईश्वरचरणी याहूनी दुसरे अन्य नसे मागणे

चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे..|| 5 ||


अखेरचा क्षण येता जवळी परमेशाला प्रार्थीन मी

अंतर ठेवूनी दोन क्षणांचे आधी प्रियेला मज नेशी,

अखंड राहो तुझ्या कपाळी सौभाग्याचे लेणे

चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे..|| 6 ||


तु असतांना संसाराला माझ्या काय उणे, 

चल सखे चल गावू मिळूनी संसाराचे गाणे......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance