Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Charudatt Mehare

Others

3  

Charudatt Mehare

Others

स्त्री जन्माची कहाणी

स्त्री जन्माची कहाणी

1 min
11.9K


काळी शेतमाऊली ही करीन मी तिचीे सेवा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| धृ ||


चिलीपिली माझी घरी सासू सांभाळी म्हातारी

एकटी मी नार आज दिनरात कष्ट करी

नाही कळला कसारे मला नशीबाचा कावा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| 1 ||


होता सुखाचा संसार घरदनी तालेवार

सूख समृध्दीन सदा नांदे माझ घरदार

झाल क्षणात उध्वस्त करू कुणाचारे धावा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| 2 ||


देव कोपला कोपला नाई पावसाच पानी

कर्ज झाल डोईवर कुणा ताळमेळ नाही

घरदनी गेला आहारी घेई दारू आता देवा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| 3 ||


दिन जाती हे निघून नाही काहीच सुधार

किती वेळ मागू लोका उधारनी पाधार

कंटाळूनी धन्याने हो फाशी घेतली तेंव्हा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| 4 ||


सगेसोयरे पांगले भाऊ बंद गेले दूर

मित्र आणि शेजा-यांचा नकारचा असे सुर

एकटी मी नार आता करू कुणाचारे धावा

नाही आसरा कुणाचा तिच देई मजला मेवा......|| 5 ||


मीच मायबाप आता झाली दोन मुलांची

कसूनीया कंबर हो सेवा धरणी मातेची

करो कुणी घाव कितीही उधळीन मी त्या डावा

नाही आसरा कुणाचा तीच देई मजला मेवा......|| 6 ||


Rate this content
Log in