STORYMIRROR

Datta Puri

Tragedy

3  

Datta Puri

Tragedy

समता

समता

1 min
11.7K

माझ्याच देशात पाहतो मी.                                     

समता दर्पणात शोधतो मी


 वणवण भटकतांना पाहतो मी

 इथल्या विमुक्त भटक्यांना


 काय असेल अन्न त्यांचे

 रोज हा अंधार पांघरताना


 ना कसण्यास शेत आहे

 ना राहण्यास आहे निवारा


 रस्त्यावर टाकून पाल

 पदराचाच आहे सहारा


कुठे शोधावे हातास काम

 कसा मिळवावा जगण्यास दाम


 कधीच ना मिळाली वीज

 मिळतेच कुठे नळाचे पाणी.  


 हापापल्या सत्ताधाऱ्यांपुढे

 अबोलीच राहते त्यांची वाणी


 रोजच्या माधुकरी मजुरीवर

 चालते त्यांची ही चूल


 आजच्या व्यवस्थेला पडली

 आहे त्यां साऱ्यांची भूल


 ज्यांच्याकडे गाड्या माड्या 

 त्यांनाच इथे मिळे भरपाई


 पण रस्त्यावरची जिंदगानी

 रस्त्यावरच हरपून जाई


 संसार थाटला उघड्यावर

 नाही उद्याचा काही पत्ता


दिवस तर बदलत नाही

असो कोणती ही सत्ता 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy