STORYMIRROR

Sangeeta Mehta

Abstract Tragedy

3  

Sangeeta Mehta

Abstract Tragedy

समर्पण

समर्पण

1 min
171

धुंदीत स्पर्श स्पर्शात धुंदी

लाजून लाज आज बंदी

प्रतिसाद अजाण अधीर सुखे

काट्यांचे फुलले गुलाब नवखे

हव्यास हळवा समर्पणाचा

आधार हवा म्हणे दर्पणाचा

अतृप्त तृप्ती संस्कार भीती

पूजनासाठी वळल्या वाती

वातींचा नको लावू दिवा

अंधारच मला माझा हवा

चाले वातींना जपुनी झुरणे

नको म्हणते जळुनी संपणे

नको चेतवू नको पेटवू

आग लावुनी नकोस शमवू

भंगलेली अशी ही प्रतिमा

गाभारा परी नाही रिकामा

मृगजळ सरता हे सख्या

होशील भक्ताला पारखा


Rate this content
Log in

More marathi poem from Sangeeta Mehta

Similar marathi poem from Abstract