STORYMIRROR

MAHESH KOMBE

Romance

4  

MAHESH KOMBE

Romance

सखे...!!!

सखे...!!!

1 min
565

रूप साजिरं गोजिरं, फुल गुलाबाच्या परी

तुझं बघणं ग सखे, जादू करे माझ्यावरी..!!


सारे विश्वाचे नखरे, कसे भरले तुझ्यात

बघ जराशी इकडे, तुझी छाया गं माझ्यात..!!


तुझी डोळ्याची पापणी, कशी तोऱ्यात हालते

गालातल्या खळीवर, जीव माझा गं झुलते..!!


केस येति डोळ्यावर, जशी चंद्राची गं कोर

तुझा नाजूक तो हात, रूप तुझं गोर गोरं..!!


तुझी नाजूक ती चाल, नागिणीला ही लाजवी

तुझे मऊ मऊ गाल, रस शृंगार पाजवी..!!


अशी कशी पृथ्वीवर, त्याने तुला गं आणली

साऱ्या अप्सरा परीस, तूच रूपाने न्हानली..!!


तुला उपमा कशाची, देऊ समजत नाही

सारे नक्षत्र तुझ्यात, माझे नयन गं पाही..!!


अशी लाजू नको आता, बोल थोडं काहीतरी

तुझ्या मुखात येऊ दे, प्रेम थोडं माझ्यावरी..!!


प्रेम असते कसं हे, मला नाही गं कळलं

पर तुलाच बघून, मन प्रेमाने वळलं..!!


सखे सहवास मला, तुझा जन्मभर हवा

पुस्तकात या प्रेमाच्या,धडा लिहुया गं नवा..!!


बस पुरे झालं आता, हात माझ्या हाती तू दे

तुझ्या मिठीमध्ये माझं, सारं आयुष्य संपू दे..!!


Rate this content
Log in

More marathi poem from MAHESH KOMBE

Similar marathi poem from Romance