सखा
सखा


एकटी असते मी जेव्हा, मन उदास असते..
तुझ्या येण्याने, मन बहरून जाते..
पण का आला नव्हतास म्हणून, मनात होती असंख्य कोडी...
मग हळूच येऊन, रिमझिम बरसून मला लावायचास लाडी गोडी...
तुझ्या त्या स्पर्शाने, राग जायचा उडून आणि मी चोरून घ्यायची अंग...
मग क्षणात गडप होऊन, दाखवायचास तुझे रंग...
खूप छळायचास मला, किती होता तो तुझा नाटकीपणा
मग खिडकीत बसून, तू येतोस का म्हणून वाट बघायची पुन्हा...
विचार करते, कळत नाही का असा वागायचास...
कधी रिमझिम तर, कधी धो धो बरसायचास...
मग धो धो बरसून, खूप करायचास अति....
तुझं ते रौद्र रूप पाहून, थांबायची माझ्या कामाची गती...
आठवतं का तुला? लागता चाहूल तुझ्या येण्याची...
भान हरपून धावत येऊन, मी तुला भेटायची...
पण का येत नाहीस माझ्या भेटीला, मनी आहे खंत...
वाट बघत आहे, नको पाहूस माझ्या सहनशीलतेचा अंत...
आता तरी लवकर ये, मला पुन्हा पुन्हा भिजायचं...
मनात साचलेल्या आठवणींना, वाट करून द्यायचयं...