शिवप्रताप
शिवप्रताप
प्रतापगडाच्या पायथ्याशी दहा
नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला
शिवबानी दाखवला शिवप्रताप
अफजल खानचा कोथळा काढला.
विडा उचलला अफजलने आदिलच्या
सांगण्यावरून चिरडण्याचा शिवबाला
भेट घेण्याचे ठरले प्रतापगडाखाली
मस्त शामियाना बांधला भेटायला.
दूरदृष्टीच्या शिवबाने केला छान आराखडा
सैन्यास दूर ठेऊनी बंडा ,महाळा संगतीने
ठरवले भेटण्याचे शानदार शामियानामध्ये
आवो शिवबा करून दगा दिला अलिंगनाने.
चिलखत घातले होते अंगावर म्हणुनी
वार अफजलचा चुकला अन् संधी साथुनी
बिचुवाचा मारा केला पोटावर अन्
वाघनखे घुसवुनी वध केला कोथळा काढुनी.
वीर शिवबाची ही कथा आज ही देते स्फुरण
प्रतापगड आहे ह्या गोष्टीला एतिहासिक साक्षीदार
जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र माझा
त्याचा एकमेव जाणता राजा शिवबाचा जयजयकार.
