STORYMIRROR

Pranav Mode

Inspirational

3  

Pranav Mode

Inspirational

शिकवण आजची...

शिकवण आजची...

1 min
384

आज काय केला मूर्खपणा,

आईला शिकवितो धडा,

तिच्या प्रेमळ हृदयावर

ठेवला गेला अतूट कडा...


न विचार करता त्या दुःखाश्रूंचे,

न दिसले ते जळते काळीज,

पलट प्रश्न झाला,

"हेच का तुझ्या बाळकडुचे चीज?"


मग बाबांनी समजावले...


"अफाट दुनियेतील तू एक कण,

तुझ्या यशासाठी झुरते तिचे मन,

तुझ्या गुणांच्या रुजवणीसाठी लोटला तिने काळ,

मग हीच परतफेड का रे लडिवाळ?"


"फक्त एक लक्षात ठेव तू,

तू तिच्या हृदयात वसतो आणि

आनंद देता येत नसेल तर त्याला,

हिरावून घेण्याचाही अधिकार नसतो !"


आता आई ला सुखी करायचे,

या पुढच्या प्रयोजनेने,

केले काबीज प्रेमाच्या कैदेत मनाला

माझ्या महत्प्रयासाने....


...या परीक्षेत तरी उत्तीर्ण झालो,

पण एक विचार सतत मनात बसतो,

आनंद देता येत नसेल तर त्याला,

हिरावून घेण्याचाही अधिकार नसतो !..

                                                     ~ प्रणव.र. उ. वि.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational