Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shivam Madrewar

Romance Tragedy

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे

1 min
274


लेखणीतील शाईने सर्व काही लिहावे,

वाक्यांचा विळख्यात शब्द ते हरवावे,

शेवटी सर्व जाऊनी पुस्तकांनध्ये बसावे,

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.


लेखणीतील शाईने हसणाऱ्याला हसवावे,

दु:खामध्ये रडणऱ्याचे दु:ख मिळवावे,

प्रत्येकाच्या मनातील राग ते जिंकावे,

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.


लेखणीतील शाईने क्रोध विसरावे,

प्रत्येकक्षणी आनंदी आनंद व्यक्त करावे,

संकटांना संकटाच्या गर्भामध्येच टाळावे,

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.


लेखणीतील शाईने कागदावरती उमटावे,

अप्रतीम काव्य, लेख  त्या शाईने रचावे,

सुंदर अशा हस्ताक्षरांमध्ये दाहीदिशेने पसरावे,

शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.


लेखणीतील शाईने कागदावर प्रेम करावे,

सदैव कवी, लेखकांच्या सानिध्यात असावे,

ह्या कवींच्या मनातून सगळीकडे व्यक्त व्हावे,

अन् शेवटी, लेखणी व शाई सोबती असावे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance