शेवटची भेट
शेवटची भेट
अजून आठवते तुझी माझी ती शेवटची भेट
स्वत:ला हरवून दिले होते मी तुझ्या मिठीत थेट
हळूच स्पर्श केले होते तू मला जेव्हा
भावनांच्या भरात चिंब भिजून गेले होते मी तेव्हा
तेव्हा तुझ्या मिठीत किती ओलावा होता
हातातून हात जरी वेगळे तरी
मन मात्र एकमेकांना घट्ट धरुन होता
किती सुखद तो स्वप्न होता
किती भारावून ठाकणारा तो क्षण होता
कधी नव्हता तितका तो तुझा माझा
आपुलकीचा सहवास होता

