STORYMIRROR

Suvarna Patukale

Romance

3  

Suvarna Patukale

Romance

साथ

साथ

1 min
242

अश्रू देती साथ जैसे, तू सखे देशील का?

सुखासंगे दुःख माझे, सांग तू वरशील का?

वाट पाहुनी रोज अशी ही

दिवस हे सरले किती

जीवनातील क्षण क्षणाला

मी असा हरलो किती

प्रीत मजला द्यावया तू, हृदय हे हरशील का

सुखासंगे दुःखं माझे, सांग तू वरशील का?

सांज सरली, रात उरली

या नभाच्या अंगणी

रिक्त कोरे स्वप्न माझे

लोचनांच्या कोंदणी

आज माझ्या जीवनी या रंग तू भरशील का

सुखासंगे दुःखं माझे, सांग तू वरशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance