साथ
साथ
जगताना साथ हवी अशा माणसांची
ताकद त्यांच्यात असेल रडतानाही हसवण्याची
जेव्हा वाटतं कसं होईल आपलं, तेव्हा
काळजी नको मी आहे, असं म्हणणारं कुणी हवं....
खरंच असंही कुणीतरी आपल्या वाट्याला यावं....
नशिबाच्या पटातील प्रत्येक डाव मांडताना
सुख-दुःख वाटून घेणारं सोबत माणूस असताना
किती छान वाटतं, असं जिव्हाळ्याचं कुणी असलं तर
अश्रू पुसणारं, प्रेमानं कुरवाळणारं
आपल्या आनंदात त्याचं सुख शोधणारं
असं हवं कुणीतरी खास
आपल्या दुःखात अडकलो कधी
तर कोणी तरी हवं असं खास

